Maharashtra Government Relaxes Covid Restrictions | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात कोरोनावरील सर्व निर्बंध हटवले, जाणून घ्या मास्क मुक्तीबाबत काय झालं ?

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Government Relaxes Covid Restrictions | कोरोनाच्या (Coronavirus) महामारीमुळे महाराष्ट्रात निर्बंध लावण्यात आले होते. मागच्या काही महिन्यात कोरोना नियंत्रणात आल्याने काही निर्बंध सरकारकडून कमी करण्यात आले. दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने (Thackeray Government) मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र येत्या गुढीपाडव्यापासून कोरोनाच्या निर्बंधांपासून पूर्णपणे मुक्त (Maharashtra Total Unlock) होणार आहे. या निर्णयामुळे यंदाचा गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात, आनंदात तसेच शोभायात्रा काढून साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Maharashtra Government Relaxes Covid Restrictions)
राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra Cabinet) येत्या काळात येणारे सण – उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे. या संदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट केलं आहे. ”गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, आंबेडकर जयंतीला मिरवणुका काढता येणार आहेत.
तसेच रमजानही उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे. तर, ”गुढी पाडव्यापासून सगळे निर्बंध हटणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे. तसेच मास्क घालणं ऐच्छिक असणार असल्याचं ते म्हणाले.
आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले ……
गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा
रमजान उत्सहात साजरा करा
बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2022
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता आटोक्यात आल्याने निर्बंध उद्यापासून हटवण्यात येणार आहेत. उद्यापासून हे निर्बंध हटवण्यात आल्याने 2 एप्रिल 2022 रोजी येणारा गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) यंदा उत्साहात, आनंदात तसेच शोभायात्रा काढून साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, महत्वाचे म्हणजे सर्व निर्बंध हटवण्यात आले असून त्यात मास्क मुक्तीचाही निर्णय घेण्यात आला असल्याचं सागितलं जात आहे.
Web Title :- Maharashtra Government Relaxes Covid Restrictions | corona restrictions removed completely in maharashtra mask compulsion withdrawal maha govt relaxes covid restrictions
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Comments are closed.