मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपन्यांच्या सुमारे एक लाख कर्मचार्यांसाठी बोनसची घोषणा केली. या कर्मचार्यांनी दिवाळीदरम्यान संपावर जाण्याचा इशारा दिला होता.
नितीन राऊत यांच्या प्रवक्त्याने दिली माहिती
मंत्र्यांनी बोनसची घोषणा केली आहे. मात्र, त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नाही. या घोषणेमुळे पारेषण कंपनी महाट्रान्सलस (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि.), वितरण कंपनी एमएसईडीसीएल (महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.) आणि उत्पादन कंपनी महाजेनको (महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लि.) च्या कर्मचार्यांना लाभ मिळणार आहे. या कंपन्यांच्या कर्मचार्यांनी बोनस न मिळाल्यास शनिवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मागच्या वर्षी तीनही कंपन्यांच्या कर्मचार्यांना 9,000 रुपये ते 15,000 रुपयांपर्यंत बोनस मिळाला होता.
अंगणवाडी कर्मचार्यांनासुद्धा बोनस
गुरुवारी राज्याच्या महिला आणि बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले होते की, अंगणवाडी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आहे. सर्वांनी लॉकडाउनदरम्यान लाखो मुले आणि स्तनदा मातांपर्यंत आहार पोहाेचवला आहे. राज्यातील 93,348 अंगणवाडी कार्यकर्त्यांना, 88,353 अंगणवाडी सहायक आणि 11,341 लघू-अंगणवाडी कार्यकर्त्यांना 2-2 हजार रुपयांचा बोनस मिळेल. यासाठी बजेट निर्धारित करण्यात आले आहे.