नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्या २१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. काळ सायंकाळी ६ वाजेपासून प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यामुळे उमेदवार आता घरोघरी जाऊन गुप्तपद्धतीने प्रचार करत आहेत. त्यातच आता हरियाणातील असांध विधानसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार बख्शीश सिहं विर्क यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) संदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. ईव्हीएम मशीन सेट असल्याचं खळबळजनक विधान त्यांनी यावेळी केलं.
#HaryanaAssemblyPolls BJP candidate Bakshish Singh gloating over EVMs.. pic.twitter.com/yQInNhhM3h
— Anand Patel (@patelanandk) October 20, 2019
या संदर्भातील बख्शीश सिहं यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा प्रमाणात वायरल होत आहे. प्रचारात एका भाषणावेळी त्यांनी ईव्हीएम संदर्भात घोषणा देत म्हंटले कि, तुम्ही कोणतंही बटन दाबा, पण मतदान हे भाजपलाच पडणार असल्याचं विधान त्यांनी यावेळी केलं. तसेच ते पुढे म्हणाले कि, तुम्ही जर तुम्ही आज चुकलात तर, तुम्हाला पुढची ५ वर्षे याची शिक्षा भोगावी लागेल.
तसेच कोणी कोणाला मतदान केलं याची माहिती आम्हाला कळते, तुम्ही म्हणत असला तर आम्ही ती तुम्हाला देऊ शकतो. मोदी आणि मनोहरलाल यांच्या नजर अगदी तीक्ष्ण आहेत, त्यामुळे तुम्ही कोणलाही मतदार केलं तरी मत हे भाजपलाच पडणार आहे, आम्ही तश्या मशिनी सेट केल्या आहेत. तसेच भाजपलाच मतदान करा असं धमकीवजा आवाहनही विर्क यांनी या वेळी केलं आहे. बख्शीश यांच्या भाजपने ईव्हीएम मशीन सेट केल्याच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Visit : bahujannama.com