बीड : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या झालेल्या दारुण पराभवामुळे उमेदवारांनमध्ये विरोधी पक्ष नेते उमेदवारांचा जोश वाढविताना दिसून येत आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे बीड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला आहे. ‘बस्स तू चलना मत छोडना… बस्स तू लढना मत छोडना’ या कवितेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. तसेच बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना विजयी करण्यासाठी जिल्ह्यात अनेक सभा घेतल्या. मात्र सोनवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवातून सावरण्यासाठी धनंजय मुंडे यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना साद घातली. ‘बस्स तू चलना मत छोडना… बस्स तू लढना मत छोडना’ असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या कवितेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.
धनंजय मुंडेंनी सोनवणे यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.