मुंबई : बहुजननामा ऑनलाइन : देशातील विविध राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 49,447 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 37,821 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, यामध्ये 277 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
Maharashtra reports 49,447 new COVID cases, 37,821 recoveries, and 277 deaths in the last 24 hours
Active cases: 4,01,172
Total recoveries: 24,95,315
Death toll: 55,656 https://t.co/6iHnetWTkN pic.twitter.com/AIaOzQKN7D— ANI (@ANI) April 3, 2021
महाराष्ट्रात आत्तापर्यंत 24,95,315 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 84.49% वर पोहोचला आहे. तर राज्यात सध्या कोरोनाचे 4,01,172 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र, आत्तापर्यंत 55,656 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सध्या 21,57,135 रुग्ण होम क्वारंटाईन असून, 18,994 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
पुण्यात रुग्णसंख्या वाढतीच
राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या ही एकट्या पुण्यात आहे. आत्तापर्यंत 5,64,286 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 4,82,214 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 8,425 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच पुण्यात सध्या 73,599 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
Today, newly 49,447 patients have been tested as positive in the state. Also newly 37,821 patients have been cured today. Totally 24,95,315 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 4,01,172 bThe patient recovery rate in the state is 84.49%.
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 3, 2021
मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या जास्त
मुंबई, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत आत्तापर्यंत 4,41,475 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 3,67,899 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 11,754 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 60846 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.