मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच असल्याचे दिसत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येसह कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. आज दिवसभरात 2 हजार 498 नवे कोरोनाबाधित आढळले आहे. तर 50 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय, दिवसभरात 4 हजार 501 जणांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 19 लाख 22 हजार 048 वर पोहचली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट 94.4 टक्के इतका आहे. मागील काही दिवसांपासून रिकव्हरी रेट कमी होताना पहायला मिळत आहे. आतापर्यंत 18 लाख 14 हजार 449 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 57 हजार 159 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
Maharashtra reports 2,498 new #COVID19 cases, 4,501 discharges, and 50 deaths today, as per State Health Department
Total cases: 19,22,048
Total recoveries: 18,14,449
Total active cases: 57,159 pic.twitter.com/MlB0Ie14PS
— ANI (@ANI) December 28, 2020
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 25 लाख 43 हजार 772 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 19 लाख 22 हजार 048 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.32 टक्के आहे. सध्या राज्यात 4 लाख 52 हजार 535 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 3 हजार 138 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.