नवी दिल्ली : Maharashtra Corona Vaccination | महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरण्याच्या मार्गावर आहे. वेगवान लसीकरण मोहिमेमुळे हे यश मिळाला आहे. महाराष्ट्राने मंगळवारी (9 नोव्हेंबर) कोरोना व्हॅक्सीनचे 10 कोटी डोस देण्याचा विक्रम (Maharashtra Corona Vaccination) केला. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope, Health Minister) यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांच्या व्हॅक्सीनेशनचा विक्रम केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो.
राज्याने 10 कोटींचा आकडा पार केला असला तरी यापैकी केवळ 3 कोटी 20 लाख 74 हजार 504 लोकांनाच व्हॅक्सीनचे दोन्ही डोस मिळाले आहेत. 6 कोटी 80 लाख 53 हजार 77 लोकांना कोरोनाचा पहिला डोस मिळाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुंबई, पुण्यात सर्वात वेगाने होतेय लसीकरण
राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वात वेगाने लसीकरण होत आहे. मुंबईत 1 कोटी 49 लाख 92 हजार 825 डोस देण्यात आले आहेत. पुण्यात 1 कोटी 22 लाख 33 हजार 340 डोस दिले आहेत.
औरंगाबादमध्ये सक्ती करणार
औरंगाबादमध्ये लसीकरण कमी होण्याची तक्रार वारंवार समोर येत होती.
येथे आता लसीकरण वेगाने करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांना व्हॅक्सीन (Maharashtra Corona Vaccination) किमान एक डोस घेतला आहे आता त्यांनाच पेट्रोल, गॅस आणि रेशन मिळेल.
पहिल्या डोसच्या प्रमाणपत्राची तपासणी करून मगच वरील सेवा दिल्या जातील.
web title: maharashtra corona vaccination maharashtra crossed benchmark of administration of 100 million covid vaccine doses.
Earn Money | खुशखबर ! RBI देतय 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, तात्काळ जाणून घ्या काय करावे लागेल?