मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रापाठोपाठ आता शिवसेनेने गोव्यात राजकीय भुकंप घडविण्याची तयारी सुरु केली आहे. गोव्यातील उपमुख्यमंत्र्यांसह चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असून आम्ही गोव्यात नवी आघाडी उभारत आहोत, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. गोवा फारवॅर्ड ब्लॉकचे माजी मुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्यासह ४ आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. गोव्यात शिवसेना नवी आघाडी लवकरच उभारणार असून भाजपाचे सरकार खाली खेचणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: Goa Forward Party president & ex-Dy CM of Goa, Vijai Sardesai along with 3 MLAs, is forming alliance with Shiv Sena. A new political front is taking shape in Goa, just like it happened in Maharashtra. Jaldi hi Goa mein bhi aapko ek chamatkar dikhai dega. pic.twitter.com/IBQKsmKmbU
— ANI (@ANI) November 29, 2019
गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपापेक्षा काँग्रेसला ४ जागा अधिक मिळाल्या होत्या. परंतु, नेतानिवडीत काँग्रेसने वेळ लावल्याने त्याअगोदर सत्तेचा दावा करीत भाजपाचे मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री झाले होते. पर्रीकर यांच्या निधनानंतर नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने मध्यरात्री प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर काँग्रेसच्या चार आमदारांना फोडून भाजपाने बहुमत मिळविले होते. पर्रीकर यांच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री असलेल्या विजय सरदेसाई यांना डावण्यात आले होते.
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला २५ वर्षानंतर त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला होता. ४० सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपाने फोडाफोडी करुन बहुमत मिळविले होते. त्यामुळे आता या सदस्यांना पुन्हा पक्षात घेऊन भाजपा सरकारला खाली खेचण्यासाठी नवी आघाडी बनविणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Visit : bahujannama.com