बहुजननामा ऑनलाईन टीम : निवडणुकीपुर्वी एकमेकांसोबत युती करणारे पक्ष आता एकमेकांचे विरोधक बनले आहे. शिवसेना आणि भाजप पक्षाचे नेते एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाही. मुख्यमंत्र्यांनी आरे आंदोलकांवरील आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता लवकर महाराष्ट्र सरकार दाऊतवरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीनचीट देणार असल्याची टीका भाजपा नेते मोहित भारतीय यांनी केला आहे. त्याचबरोबर आरेमधील आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्यासाठी राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मोहित भारतीय यांनी ट्विट केले आहे की, ‘ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला महाराष्ट्र सरकार लवकर क्लीनचीट देणार आहे. राज्यात गुन्हे मागे घेण्याचं सत्र सुरु आहे. त्वरा करा, काही दिवस शिल्लक आहेत. ‘
Sources : Dawood May Get all Cases Withdrawn and Get Clean Chit from Maharashtra Government Soon . AS ITS CASES WITHDRAWN SEASON GOING ON . HURRY UP LIMITED DAYS LEFT …
— Mohit Bharatiya (@mohitbharatiya_) December 2, 2019
आरेमधील ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यांची यादी मुंबई पोलिसांनी द्यावी, मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्यावरील गुन्हे घेतलेत ते ख्रिश्चनआणि कम्युनिस्ट पक्षाची माणसे आहेत. यामागे राजकारण काय आहे ? असा देखील प्रश्न मोहित भारतीय यांनी विचारला आहे.
Can @MumbaiPolice Share the list of People who are accused in Aarey . @CMOMaharashtra has withdrawn all cases from tham . The People Accused are related to Christians Missionaries and Communist Party . What is Politics behind this . #MumbaikarsWantToKnow
— Mohit Bharatiya (@mohitbharatiya_) December 2, 2019
आरे मेट्रो कारशेड आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच दिला आहे. त्यानंतर नाणारविरोधी आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्यात यावेत, अशी मागणी पुढे आली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य करून नाणारविरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.
Visit : bahujannama.com