मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | आज अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde Fadnavis Government) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून दोन्हीकडील 9-9 अशा 18 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचे वृत्त आहे. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsath) नाराज असल्याची चर्चा होती. (Maharashtra Cabinet Expansion)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
परंतु, शिरसाट यांनीच नाराजीवर खुलासा करताना म्हटले की, प्रत्येकाला वाटते, की मी मंत्री झालो पाहिले. तसे मलाही वाटते. पण याचा अर्थ असा नाही, की मी नाराज आहे. आमचा शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, मी नाराज नाही.
शपथविधी समारंभापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, मी नाराज नाही. आम्ही सत्तेत असताना उठाव केला आहे. यामुळे यात नाराजी वैगेरे नाही. सत्तेसाठी आम्ही बाहेर पडलेलो नाही. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले चालायला हवे. त्यामुळे आम्ही नाराज नाही. शिंदे साहेबांनीही आम्हाला सांगितले आहे, की चिंता करू नका, तुमच्या पाठीशी मी उभा आहे. (Maharashtra Cabinet Expansion)
संजय शिरसाट यांची पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी अटकळ असताना अचानक शिरसाट यांचा पत्ता कट करण्यात आला.
याबाबत विचारले असता शिरसाट म्हणाले, प्रत्येकाला वाटते, की मी मंत्री झालो पाहिले.
तसे मलाही वाटते. पण याचा अर्थ असा नाही, की मी नाराज आहे.
आमचा शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आणि तो विश्वास कायम राहणार आहे.
याचवेळी, अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मी नाराज नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, मंत्रिपद मिळणार नाही हे काल रात्री समजल्यावर शिरसाट यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली,
याभेटीत मोठी खडाजंगी झाल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले होते.
मात्र आता शिरसाट यांनी स्वत: नाराज नसल्याचे सांगितल्याने यावर पडदा पडला आहे.
Web Title : – Maharashtra Cabinet Expansion | expansion of the cabinet again after the assembly session there is no displeasure says mla sanjay shirsat
हे देखील वाचा :
Maharashtra Cabinet Expansion | ‘काही नावं टाळली असती तर…’; शपथविधी पाहून अजित पवारांचा टोमणा