मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | शिंदे सरकारला (Shinde Government) एक महिना पूर्ण होत आहे पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) मुहूर्त मिळाला आहे. 3 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) महत्त्वाची सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर 2 ते 4 दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Spokesperson Deepak Kesarkar) यांनी दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले.
दीपक केसरकर म्हणाले, अजित पवार यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. लवकरच राज्यपालांना भेटून मंत्रिमंडळाची माहिती दिली जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन गैरसमज पसरवला जात असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
लवकरच विस्तार होईल – मुख्यमंत्री
आमचे सरकार चांगले चालले आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले, पेट्रोल-डिझेलचे दर कमी (Petrol-Diesel Rates Reduced) केले आहेत.
शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला.
ही योजना थांबली होती. ती परत सुरु केली. दुष्काळी भागामध्ये पाणी वळवण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक छोटे मोठे निर्णय घेतले.
लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुण्यात दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : – Maharashtra Cabinet Expansion | cabinet expansion will be decided in 2 to 4 days say deepak kesarkar
हे देखील वाचा :
Ginger Milk Benefits | रोज आले टाकून करा दूधाचे सेवन, मान्सूनमध्ये होणार नाहीत या 3 आरोग्य समस्या
CM Eknath Shinde | मंत्रिमंडळाचा विस्तार कुठे रखडला ? एकनाथ शिंदेंचे अजित पवारांना रोखठोक उत्तर
Gold Rate | वन नेशन, वन गोल्ड रेट ! देशभरात एकाच दरात होणार सोने विक्री