मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | शिंदे सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (मंगळवार) पार पडला. राजभवनाच्या (Raj Bhavan) दरबार हॉलमध्ये (Durbar Hall) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आमदारांना शपथ दिली. सध्याच्या मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नसल्याने सध्याचे मंत्रिमंडळ हे पुरुषप्रधान मंत्रिमंडळ असणार आहे. विस्तारात कोणत्या नेत्याला कोणते मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजच्या मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) कोणत्या आमदाराला कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र शिंदे सरकारने सर्वांना धक्का दिला आहे. आज शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. आज एकाही आमदाला राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात महिला मंत्र्याला राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात येऊ शकते.
Cabinet expansion | Maharashtra CM Eknath Shinde and Dy CM Devendra Fadnavis at Raj Bhavan in Mumbai pic.twitter.com/cC9vXBvRzx
— ANI (@ANI) August 9, 2022
शिंदे गटातील मंत्री
1. तानाजी सावंत (Tanaji Sawant)
2. उदय सामंत (Uday Samant)
3. संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)
4. दादा भुसे (Dada Bhuse)
5. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
6. दीपक केसरकर (Deepak Kesarkar)
7. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
8. संजय राठोड (Sanjay Rathod)
9. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भाजपकडून मंत्री
1. गिरीश महाजन (Girish Mahajan)
2. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
3. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)
4. सुरेश खाडे (Suresh Khade)
5. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
6. अतुल सावे (Atul Save)
7. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
8. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)
9. मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)
संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला आहे.
Web Title : – Maharashtra Cabinet Expansion | assembly session cm eknath shinde dcm devendra fadnavis bhagat singh koshyari mantralaya maharashtra cabinet expansion
हे देखील वाचा :
CM Eknath Shinde | शिवसेनेच्या 2 आमदारांना लागली लॉटरी, बंडखोरीनंतर मंत्रिपद
China Mobiles | ’12 हजारपेक्षा कमी किमतीचे मोबाईल भारतात विकू शकणार नाही चीन’ – रिपोर्ट