ठाणे : बहुजननामा ऑनलाइन –महाराष्ट्रात आयकर विभागाने पाठविलेल्या नोटीशीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये राहणारा मजूर भाऊसाहेब आहीरे यास आयकर विभागाने एक कोटी पाच हजार रूपयांची नोटीस पाठवली आहे. तर आहीरे यांची रोजची मजूरी 300 रुपये आहे. आहीरे त्यांच्या कुटुंबियांसह कल्याणच्या एका झोपडपट्टीत राहतात. आयकर विभागाने त्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या रक्कमेचा संदर्भ नोटीसमध्ये दिला आहे. आहीरे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आयकर विभागाच्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीच्या दरम्यान आहीरे यांच्या खात्यात 58 लाख रुपये जमा करण्यात आले होते. आहीरे मुळ उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. आहीरे यांनी सांगितले की, मागील वर्षी 5 सप्टेंबररोजी त्यांच्या बँक खात्यात 58 लाख रूपये जमा केल्याप्रकरणी स्पष्टीकरण मागणारी नोटीस आयकर विभागाने पाठविली आहे.
आहीरे यांनी सांगितले की, ते शिक्षित नाही आणि त्यामुळे त्यांनी शेजार्यांना याबाबत विचारले. नंतर त्यांनी आयकर विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला. ज्यांनी त्यांना बँकेशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. आहीरे म्हणाले, बँकेने त्यांना सांगितले की, त्यांचे पॅन कार्ड आणि मतदान कार्डाच्या आधारे एक खोटे बँक खाते उघडण्यात आले आणि त्यामध्ये पैसे जमा करण्यात आले.
आहीरे यांनी दावा केला आहे की, फसवणूकीने खोट्या सह्या करून खाते उघडण्यात आले आहे. सोबत पॅनकार्डची कॉपी जोडण्यात आली आहे. तसेच फोटोही जोडण्यात आला आहे. यानंतर आयकर विभागाने 7 डिसेंबरला पुन्हा त्यांना नोटीस पाठवली, ज्यामध्ये 2017-18 मधील मिळालेल्या उत्पन्नासाठी एक कोटी पाच हजार रूपयांचा कर भरण्यास सांगितले गेले.
आयकर विभागाने यात म्हटले आहे की, जर कर भरला नाही तर विभाग 30 दिवसात वसूली करेल. आहीरे यांचे म्हणणे आहे की, त्यांनी आपल्या आयुष्यात कधी एक लाख रूपये सुद्धा पाहिलेले नाहीत, मग एवढे पैसे कसे भरणार.
आहीरे यांनी यावेळी पोलिसांशी संपर्क साधला आणि फसवणूक करणाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. आहीरे यांच्या तक्रारीनंतर प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा