मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या शिवसेना-भाजप मेळाव्यात ते बोलत होते की, ‘कोथरुडमध्ये अडकवून ठेवले असा पवारांचा समज आहे. पण तुम्ही या पाटलाला ओळखलेले नाही. मी चेहऱ्यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो हे समजत नाही.
माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही’ अशा शब्दांमध्ये चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीवर टिका केली. ‘या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीला माझ्याविरोधात उमेदवार मिळाला नाही. या मतदारसंघात शरद पवार, अजित पवारांचे डायरेक्ट, इनडायरेक्ट काही तरी चालले आहे. म्हणून अनेकवेळा पराभूत झालेले मनसेचे उमेदवार अॅड . किशोर शिंदे यांना आघाडीने पाठिंबा दिला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते मला भेटत असून ते म्हणत आहेत आम्ही मनसेचा झेंडा का फिरवायचा. कुणाला तरी बळीचा बकरा करायचा म्हणून आघाडीने मनसेला पाठिंबा दिला आहे’. कोथरुड विधानसभा मतदार संघातून मोठ्या फरकाने विजयी होणार असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.
Visit : bahujannama.com