Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी; निवडणूक आयोगाकडून महत्वाची माहिती समोर; निवडणूक आयुक्त म्हणाले,…

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार याबाबत उत्सुकता आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. नेत्यांचे दौरे सुरु आहेत. जागावाटपावर बैठका होत आहेत. दरम्यान आता केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केला आहे. यानंतर निवडणूक आयोगाचे (Election Commission Of India) प्रमुख राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, “आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या. स्थानिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष यांच्याशी भेटीगाठी घेतल्या. पोलीस महासंचालक (DGP Maharashtra), आयुक्त तसेच इतरांचीही भेट घेतली. आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा हे जाणून घेतले.
आम्ही बसपा (BSP), आप (AAP), काँग्रेस (Congress), मनसे (MNS), राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar NCP), शिवसेना (Shivsena Shinde Group), राष्ट्रवादी काँग्रेस एसपी (Sharad Pawar NCP), शिवसेना उबाठा (Shivsena Thackeray Group), भाजपा (BJP) अशा सगळ्या पक्षांची भेट घेतली. या पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला. तो महोत्सव लक्षात घेऊन निवडणूक तारीख जाहीर करा अशी विनंती त्यांनी केली. निवडणुकीची तारीख ही सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवा,अशीही विनंती आम्हाला कऱण्यात आली”, असे निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, पैशाची ताकद रोखण्याची विनंती काही पक्षांनी केली. पोलिंग स्टेशन दूर आहेत. वृद्धांना येण्या जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याची मागणी केली. पोलिंग एजंट त्याच मतदारसंघाचा असावा अशी काही पक्षांची विनंती केली आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्याची मागणीही पक्षाने केली आहे.
महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष ४.५९ कोटी मतदार आहेत. तर महिला ४.६४ कोटी आहेत. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली आहे. १९.४८ लाख मतदार हे नवमतदार आहेत. हे तेच मतदार आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील”, असेही राजीव कुमार यांनी सांगितले.
Comments are closed.