Maharashtra Assembly Election 2024 | ‘… तर पाचही जागांवर भाजपच्या विरोधात लढणार’, शिवसेना शिंदे गटाचा इशारा
सोलापूर: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोलापुरात शिवसेना शिंद गट (Shivsena Shinde Group) आक्रमक झाला आहे. सोलापूर मध्यची जागा भाजप लढणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. याच मुद्यावरुन सोलापूर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. (BJP)
सोलापूर मध्य ची जागा शिवसेना शिंदे गटाला सोडली नाही तर सोलापुरातील पाचही जागांवर भाजपच्या विरोधात लढणार असल्याची आक्रमक भूमिका सोलापूर शिवसेना शिंदे गटाने घेतली आहे. आम्ही जिंकलो नाही तरी चालेल पण भाजपच्या पाच जागा आम्ही पाडल्या शिवाय राहणार नसल्याचा इशारा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी दिला आहे.
सोलापूर मध्य, सोलापूर उत्तर, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा या मतदार संघात भाजप विरोधात उमेदवार देणार असल्याचे अमोल शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
Comments are closed.