Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील हालचालींना वेग; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिल्लीत बोलवलं
मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र आगामी विधानसभेसाठी काँग्रेसने (Congress) रणनीती आखत मोर्चेबांधणीस सुरुवात केली. दरम्यान हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस बॅकफूटवर आली आहे. पक्षात नाराजीचा सूर निर्माण झाला आहे.
हरियाणा विधानसभेला सामोरे जाताना रणनीती नेमकी कुठे चुकली याबाबत वरिष्ठ नेत्यांकडून विचारविनिमय सुरु आहे. पुढील एक-दोन दिवसात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे मिळालेले यश त्याचा करिष्मा कायम ठेवण्यासाठी काँग्रेसमध्ये हालचाली सुरु आहेत.
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार आहे. बैठकीसाठी काँग्रेसचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख सहा नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी चर्चा करणार आहेत.
काँग्रेसची पुढील प्लॅनिंग आणि राज्यातील जागाटावपावरही चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याने त्यावर आज चर्चा होणार आहे. सोबतच निवडणुकीच्या प्रचार रणनिती बाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
https://www.instagram.com/p/DBF4r5EJV06/
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला (Ramesh Chennithala), प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. हरियाणा राज्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राचा देखील आढावा घेणार आहेत.
Comments are closed.