Maharashtra Assembly Election 2024 | मनसे पुण्यातील सर्व जागा लढण्याच्या तयारीत; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाजपला बिनशर्त (BJP) पाठिंबा दिला होता. तसेच, राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी (Mahayuti Candidate) राज्यात सभाही घेतल्या होत्या. दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena – MNS) घेतला आहे.
पुणे शहरातील कसबा (Kasba Assembly), कोथरूड (Kothrud Assembly), पर्वती (Parvati Assembly), शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly), वडगाव शेरी (Vadgaon Sheri Assembly), कॅंटोन्मेंट (Pune Cantonment Assembly) हे ६ आणि हडपसर (Hadapsar Assembly), खडकवासला (Khadakwasla Assembly) हे दोन असे ८ विधानसभा मतदारसंघाबाबत राज ठाकरेंनी स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याची माहिती आहे.
राज ठाकरेंनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती जाणून घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे मतदारसंघ आपण लढवणार आहोत, कामाला लागा अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत.
नवीन शाखा, कार्यकर्त्यांच्या बैठका, जबाबदारी सोपवणे अशा सूचना त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. तसेच पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ जागा लढवणार असल्याचे राज ठाकरेंनी म्हंटले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे ग्रामीणसाठी (Pune Rural) राज ठाकरेंनी अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांची नियुक्ती केली होती तर पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांकडे राज्यातील काही जिल्ह्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. बाबू वागसकर Rajendra (Babu) Wagaskar – सोलापूर, ऍड गणेश सातपुते Adv Ganesh Satpute – परभणी, हेमंत संभूस Hemant Sambhus – हिंगोली, साईनाथ बाबर Sainath Babar – बुलढाणा यांचा समावेश होता.
Comments are closed.