Maharashtra Assembly Election 2024 | ठरलं! काँग्रेसचे दोन बडे नेते मनसेत प्रवेश करणार; राजकीय समीकरणे बदलणार

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. इच्छुक उमेदवार ज्या पक्षातून उमेदवारी मिळेल तिकडे पक्षांतर करताना दिसत आहेत. लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेने (MNS) आता विधानसभेला स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे.
त्यामुळे मनसेकडून उमेदवारी हा आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे काही नेते संपर्कात असल्याचा दावा मनसेच्या नेत्यांकडून केला जातोय. पालघर तालुक्यातील काँग्रेसचे दोन प्रमुख पदाधिकारी येत्या १३ ऑक्टोबरला मनसेत प्रवेश करणार आहेत. यात माजी खासदार दामू शिंगडा (Damodar Shingada) यांचे सुपूत्र सचिन शिंगडा (Sachin Shingada) यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंगडा, नरेश कोरडा हे पदाधिकारी समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत. सचिन शिंगडा हे विक्रमगड मतदारसंघातून (Vikramgad Assembly Constituency) तर नरेश कोरडा पालघरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
विक्रमगडमध्ये विद्यमान आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (Sharad Pawar NCP) सुनील भुसारा (Sunil Bhuasara) हे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता कमी आहे. त्यातूनच सचिन शिंगडा यांनी मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नरेश कोरडा हे पालघरमधून विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत.
Comments are closed.