Maharashtra Assembly Election 2024 | केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम 27, 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर
बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला असून येत्या 27 आणि 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौरा करणार आहे. ते राज्यातील प्रमुख अधिकार्यांची बैठक घेणार असल्याचे माहिती सूत्रांकडुन देण्यात आली आहे.
सर्वच राजकीस पक्षांची निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. प्रमुख पक्षांमध्ये सध्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जागा वाटपांवरून वाद सुरू आहेत. यातच आता निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान वंचितने 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. वंचित आघाडीकडून रावेर, सिंधखेड राजा, वाशिम, धामणगाव, नागपूर साऊथ वेस्ट, साकोली, नांदेड साऊथ, लोहा, औरंगाबाद इस्ट, शेवगाव, खानापूर या मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
तिसरी आघाडी देखील सक्रिय
महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेला होणार असे चित्र दिसत असले तरी राज्यात तिसरी आघाडी देखील स्थापन करण्यात आली आहे. राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, संभाजीराजे यासोबतच इतर काही नेत्यांनी एकत्र येत काही दिवसांपूर्वी परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे निवडणूक अधिक रंजक होईल यात शंका नाही. त्यातच वंचितने उमेदवार जाहीर करून जय्यत तयारी सुरू केली आहे.
Comments are closed.