Maharashtra Assembly Election 2024 | ‘यंदा राज्यात महायुतीचे सरकार येईल’, अमित शहांचा विश्वास; म्हणाले – ‘२०२९ ला एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायचीय’
मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत (Amit Shah Maharashtra Tour). दरम्यान शहा यांनी आज भाजपच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी सूचना केल्या आहेत. “प्रत्येक बुथवर १० टक्के मतदान वाढवा. सरकार आपले आहे त्यामुळे आपल्याविरुद्ध नाराजी असेल. नगरसेवक, आमदार व खासदारांच्या विरोधात असलेली नाराजी दूर करा. प्रत्येक बूथवर आपल्याला १० कार्यकर्ते पाहिजेत.
दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बुथ च्या कक्षेत फिरत राहतील. आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा. प्रत्येक बूथवर किमान २० लोकांना भाजपचे सदस्य करा. सदस्य करताना मतं मागू नका. सदस्य झाल्यावर त्याला आपसुकच मतदानाचे महत्त्व कळेल”, असे अमित शहा यांनी म्हंटले.
अमित शहा म्हणाले, ” मी कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत मजल मारली. म्हणून मी जेव्हा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतो तेव्हा मला खूप आनंद होतो. काही निवडणूक या देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात. माझ्या अनुभवावरून सांगतोय. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा व दशा बदलेल. गेल्या वर्षांत कुठलाही राजकीय पक्ष सलग तीन वेळा जिंकलेला नाही
ते पुढे म्हणाले, ” जे सरकार काम करत तेच निवडणुक जिंकतात, देशात आपण सलग तिसरे सरकार बनवले. आता आपली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका असे सांगत महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी व्यक्त केला. यंदा राज्यात महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) येईल, पण २०२९ साली एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची आहे असंही अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
Comments are closed.