Maharashtra Assembly Election 2024 | 90 टक्के जागावाटप पूर्ण, महायुतीत पहिली यादी कोणत्या पक्षाची?, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्वाची माहिती

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती (Mahavikas Aghadi Vs Mahayuti) असा सामना होणार आहे. त्यामध्ये आता तिसऱ्या आघाडीचीही भर पडली आहे. लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. (Mahayuti Seat Sharing Formula)
मनसेही (MNS) यंदा स्वबळावर लढणार आहे. वंचितकडून उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. महायुती ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार आहे. दरम्यान महायुतीच्या जागावाटपाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “जागावाटपावर गेल्या काही दिवसांपासून महायुतीची चर्चा सुरु आहे. त्यापैकी आता ९० टक्के जागावाटप पूर्ण झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये १० टक्के जागावाटप पूर्ण केले जाणार आहे. मागच्या वेळी भाजपाने विदर्भात जास्त जागा लढवल्या होत्या, तसेच यावेळीही भाजपा जास्त जागा लढवणार आहे”, असे बावनकुळे स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, ” १३ ऑक्टोबरला भाजपाच्या राज्याच्या संसदीय समितीची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये पुढील चर्चा केली जाईल आणि मग केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होईल. महायुतीच्या विविध स्तरावरील चर्चा आणि बैठकांचे सत्र पूर्ण झाले की मग सर्वप्रथम महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या शिवसेनेच्या कोट्यातील जागांवरील उमेदवार घोषित करतील. त्यानंतर महायुतीतील दुसरा महत्त्वाचा घटक पक्ष असलेले राष्ट्रवादीचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या जागेवरील उमेदवार घोषित करतील, अशी महत्त्वाची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
Comments are closed.