मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आज दुपारी भास्कर जाधव शिवसेनेत दाखल होणार आहेत. दुपारी 2 वाजताचा त्यांचा शिवसेना प्रवेश ठरला असून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी तो तात्काळ मंजूर केला. यावेळी शिवसनेचे नेते रामदस कदम, सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार उदय सामंत आदी उपस्थित होते.
Maharashtra: Nationalist Congress Party (NCP) leader & MLA from Guhagar, Bhaskar Jadhav to join Shiv Sena today. He tendered his resignation as MLA to state assembly speaker Haribhau Bagade, today.
— ANI (@ANI) September 13, 2019
राष्ट्रवादी सोडणाऱ्या जाधवांवर जोरदार टीका
अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असा दावा जाधव यांनी केला आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह ते शिवसेनेत जाणार आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेत भास्कर जाधव यांचा दावा खोडून काढत त्यांच्यावर जोरदार टीका केली.
बाबाजीराव जाधव म्हणाले, “भास्कर जाधव यांना पक्षाने खूप काही दिले. शिवसेनेतून आल्यानंतर त्यांना पवार साहेबांनी विधान परिषदेवर घेतले. मंत्रिपद दिले. प्रदेशाध्यक्ष पदही दिले. असे असताना ते पुन्हा सेनेत जात आहेत. यांचं आम्हाला दु:ख आहे. मात्र जिल्ह्यात एक दोन जिल्हा परिषद सदस्य वगळता त्यांच्यासोबत कोणीही जाणार नाही. ते करत असलेला दावाही खोटाच आहे.”