बीड : बहुजननामा ऑनलाईन- बनावट स्वाक्षऱ्या केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने बीड जिल्ह्यातील केज मतदार संघाच्या भाजपाच्या आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांच्या पतीविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. आमदार संगीता ठोंबरे यांनी केजपासून जवळच ‘स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी’ उभारली आणि सूतगिरणी मध्ये गणाजी सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्त केले होते. या प्रकरणाची फिर्यादीने केज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र गुन्हा नोंदविला नाही , म्हणून फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात न्यायालयाने सूतगिरणीचे चेअरमन डॉ. विजप्रकाश ठोंबरे, आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर फौजदारी संहिता कलम १५३(३)अन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात भाजप आमदार संगीत ठोंबरे चर्चेचा विषय ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपती सोनप्पा कांबळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार लोकनेते गोपीनाथ मुंडे सूतगिरणी केज’च्या संचालकपदी बोगस स्वाक्षरी करून निवडले, यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यांनी याआधी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कांबळे यांच्या याचिकेवर केज दिवाणी न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. न्यायालयाने सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ.विजयप्रकाश ठोंबरे व भाजप आमदार संगीता ठोंबरे या दोन्ही नवरा बायकोवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार संगीता ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यान अनेक चर्चाना उधाण आले आहे. सूतगिरणीचे काम अजूनही सुरू आहे. याच सूतगिरणीवर संचालक म्हणून नेमलेल्या एका व्यक्तीच्या बोगस स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने या प्रकरणात आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने केज येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद केला जाणार आहे. दरम्यान संगीत ठोंबरे या भाजपच्या आमदार असून पती डॉ. विजप्रकाश ठोंबरे हे लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे चेअरमन आहेत.