मनमाड : बहुजननामा ऑनलाइन – अनेक मंत्री असे आहेत की सत्तेतून पायउतार झाल्यामुळे दिसेनासे झाले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे (National Social Party) अध्यक्ष महादेव जाणकर (mahadev Jankar) यांनी भाजपसोबत (BJP) घरोबा केला आणि दुग्धविकास मंत्रिपद भुषवले. पण सत्तेतून बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर हे मीडियापासून लांबच आहेत. आता भगवी शॉल घालून महादेव जानकर अंकाई किल्ल्यावर दोन दिवस मुक्कामी होते.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन झाल्यानंतर भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. त्यानंतर महादेव जानकर हे भाजपच्या आंदोलनात एखाद्यावेळेस सहभागी होताना दिसले. अलीकडे, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासोबत ते भगवानगडावर हजर होते. त्यानंतर आता अंकाई किल्ल्यावरचा त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. माजी मंत्री महादेव जाणकर (mahadev Jankar) यांनी मनमाडपासून जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावरील अगस्तीमुनींच्या आश्रमात २दिवस मुक्काम केला. यावेळी त्यांनी किल्ल्यावर असलेले प्रभू रामचंद्र, ऋषी अगस्तीमुनींच्या मंदिर आणि मोठे बाबाच्या दरगाह इथं जाऊन दर्शन घेतले. शिवाय महंत ज्ञानगिरी बाबा यांच्यासोबत मनसोक्तपणे गप्पा मारून किल्ल्याची माहिती जाणून घेतली.
त्यांच्या मनात काय चाललं…
महादेव जानकर (mahadev Jankar) यांनी त्यांच्या या मुक्कामाबाबत कमालीची गुप्तता तर पाळलीच शिवाय मीडिया आणि लोकांना देखील भेटण्याचे टाळले. अंगावर भगवी शॉल घालून जाणकार यांनी किल्ल्यावरील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला. मात्र अचानक आणि गुपचूपपणे ते या किल्ल्यावर दोन दिवस का थांबले. त्यांच्या मनात काय चाललं. ते अस्वस्थ तर नाही ना ? मनाला शांती मिळावी यासाठी ते या किल्ल्यावर आले होते का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
कृपया हे देखील वाचा:
दुर्दैवी ! भरधाव कार खड्ड्यात कोसळल्याने चौघा शिक्षकांचा मृत्यू, हिंगोली जिल्ह्यातील घटना
Ajit Pawar | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढवा
महाविकास आघाडीत फूट ? प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका हीच पक्षाची भूमिका, काँग्रेस स्वबळावर लढणार
आता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या संशोधकांनी लावला शोध