मदुराई : वृत्तसंस्था – तामिळनाडूच्या मदुराई येथे एका दलित विद्यार्थ्यावर त्याच्या वर्गमित्राने ब्लेडने हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित विद्यार्थ्याचा दोष मात्र एवढाच होता कि , शाळेत त्याच बॅग कोणी तरी लपवून ठेवली होती, आणि तो ती बॅग शोधात होता. या दरम्यान शाळेतील एका विद्यार्थ्याने त्याच्यावर जातीवाचक टिपण्णी केली आणि त्याच्यावर ब्लेडने हल्ला केला. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त दलित विद्यार्थी ९ वी इयत्तेत शिकत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी मुलगा शाळेत असताना कोणीतरी त्याची बॅग लपवून ठेवली. बॅग शोधताना विद्यार्थ्याला समजले की त्याची बॅग त्याच्या वर्गमित्र महेश्वरनने लपवून ठेवली होती. पीडित मुलगा जेव्हा आपल्या बॅगे संदर्भात महेश्वरनला विचारण्यासाठी गेला, त्यावेळी आरोपीने त्याला शिवीगाळ केली व त्याच्या जातीबद्दल भाष्य केले. दरम्यान, या दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण वाढले. महेश्वरनने विद्यार्थ्यावर ब्लेडने हल्ला केला. छायाचित्रांमधे पीडितेच्या पाठीवर गळ्यापासून कमरेपर्यंत जखमा आहेत. ब्लेडचे वार बरेच खोल आहेत.
पीडित मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे डॉक्टरांनी त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले आहे. पीडित विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की तो फक्त आपली बॅग मागायला गेला होता, परंतु आरोपी विद्यार्थ्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शाळा प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याविरूद्ध कलम २९४ , ३२४ आणि एससी, एसटीएक्ट अंतर्गत (३)(१)(आर)(एस) आणि ३(२) (VA ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबात भीती आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले की, ते आपल्या मुलाच्या सुरक्षिततेबद्दल काळजीत आहे. आरोपी विद्यार्थ्याचे समुपदेशन केले जावे, असे त्यांनी म्हटले आहे. शाळा प्रशासनाने पीडित कुटुंबाला असे आश्वासन दिले आहे की त्यांच्या मुलाच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल.
Visit : bahujannama.com