चेन्नई : वृत्तसंस्था – तामिळनाडूमधील प्रसिद्ध पलानी मंदिराच्या (palani mandir tamil nadu) जमिनीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) सुनावणी झाली. यावेळी मंदिरातील मूर्ती महान मुलासारखी असून न्यायालय हे त्यांचे पालक आहेत. त्यामुळे त्याच्या मालमत्तेचं संरक्षण करायला हवं असं मत व्यक्त करत मंदिराच्या संपत्तीवर हक्काचा दावा करणाऱ्याना बाहेर काढण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयातील (Madras High Court) न्यायमूर्ती आरएमटी रमन (Justice RMT Raman) यांनी दिले आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
पलानी मंदिराची (palani mandir) जमीन ब्रिटीशांनी १८६३ मध्ये बक्षीस म्हणून काही लोकांना दिली होती. त्यानंतर या जमिनीवर काहींनी हक्क दाखवला. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी बचाव पक्षाने ब्रिटिशांनी इनाम म्हणून हि जमीन दिली होती. या जमिनीवर अनेक पिढ्यांचा मालकी हक्क राहिल्याचा दावा करत आपण या संपत्तीचे मालक असल्याचा युक्तिवाद केला होता. दरम्यान बचाव पक्षाने आपण मंदिराला आपण भाडं देत असल्याचंही त्यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने सांगितले कि, कायद्याच्या हिशोबाने मंदिरातील मूर्ती एका लहान मुलाप्रमाणे आहेत.
नायालय हे या व्यक्ती आणि संपत्ती या दोन्ही बाजूंनी लहान मुलासाठी पालक आहे. त्यानुसार मंदिरातील मूर्तीचंही रक्षणकर्ता न्यायालय असून मंदिराच्या संपत्तीचीही लहान मुलाप्रमाणे सुरक्षा करायची आहे असे सांगतानाच मंदिराला भाडे देत असल्याचा बचाव पक्षाने केलेल्या युक्तिवादाकडे लक्ष वेधत याचा अर्थ तुम्ही मालक नाही तर भाडेकरु आहात असे न्यायालयाने म्हंटले. त्याचबरोबर ६० वर्ष मंदिराला स्वतःच्या संपत्तीचा वापर करण्यापासून रोखण्यात आलं होतं याकडे लक्ष वेधलं. मंदिराच्या संपत्तीवर बचाव पक्ष आपला हक्क सिद्ध करु शकले नसल्याचंही न्यायालयाने सांगत संपत्तीच्या कोणत्याही भागावर मालकी हक्काचा दावा केला जाऊ शकत नाही असं कोर्टाने स्पष्ट केले.
तामिळनाडूमध्येआलेल्या Inam Abolition Act यावर तहसीलदार स्तरावर तोडगा काढण्यात आल्यानंतरही हे लोक मंदिराच्या संपत्तीवरील आपला हक्क सोडण्यास तयार नव्हते.
विविध मार्गाचा अवलंब करून हे लोक मालकी हक्क सांगत होते.
जमिनीच्या मालकी हक्कावर दावा करणारे वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत होते.
दरम्यान मद्रास हायकोर्टाने अधिकाऱ्यांना चार आठवड्यांमध्ये मंदिराची संपत्ती रिकामी करावी असा आदेश दिला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेवर आयुक्तांना नजर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
तिरुपूर येथील धारापूरममध्ये पेरियाकुमारापलयम गावात सुमारे ६० एकरापेक्षा अधिक जमीन आहे.
या संपत्तीवर मंदिरातील देवता मुरुगन स्वामीचा अधिकार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
Web Title :- Madras High Court | idol of temple is akin to minor child court has to protect properties of idol madras high court tamil nadu palani temple
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update