नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बद्रीलाल यादव यांच्यावर मध्य प्रदेशातील राजगडचे जिल्हाधिकारी निधी निवेदिता यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस बियोरा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरुद्ध अश्लील भाषा वापरल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. बियोराचे एसडीएम संदीप अष्टाना यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी राजगड जिल्ह्यातील बियोरा येथे झालेल्या मेळाव्याला संबोधित करताना भाजप नेते बद्रीलाल यादव यांनी राजगड जिल्हाधिकाऱ्यांना आक्षेपार्ह विधान केले. आश्चर्याची बाब म्हणजे या बैठकीत मध्यप्रदेश भाजपाचे कैलास विजयवर्गीय, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राकेश सिंह आणि विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांच्यासारखे मोठे नेते सहभागी झाले होते.
कैलास विजयवर्गीय आणि शिवराज येण्यापूर्वी त्यांनी व्यासपीठावरून भाषण केले आणि म्हणाले, ‘माझा मुद्दा चुकीचा समजू नका, परंतु माझ्या मनात एक गोष्ट आली, म्हणूनच मी बोलत आहे. जिल्हाधिकारी तिच्या मांडीवर कॉंग्रेसवाल्यांना दूध पाजते आणि भाजपाला कानशिलात मारते. असे वक्तव्य त्यांनी केले त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. बद्रीलाल यादव यांच्या विधानावर कॉंग्रेसने कडक आक्षेप घेतला आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्याचबरोबर आयएएस असोसिएशननेही मुख्य सचिवांना एक पत्र लिहून महिला अधिकाऱ्यांवर केलेल्या टीकेला अशोभनीय वक्तव्य म्हंटले होते.
भाजप नेत्याची जीभ घसरली
केवळ बद्रीलालच नाही, तर भाजपचे बाकीचे नेते व्यासपीठावर भाषण देण्यासाठी गेले असता सीमा ओलांडताना दिसले. भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी असेही म्हटले होते की जर संविधान नसते तर तुम्ही घरी बसून भाकर बनवत असता. प्रत्यक्षात, सीएएच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर चापट मारल्यानंतर गोपाल भार्गव यांनी महिला जिल्हाधिकाऱ्याला संबोधित करताना सांगितले की गर्दीत तुला काय शिरण्याची गरज आहे ? एवढेच नाही तर पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावून गोपाळ भार्गव यांनी महिला कलेक्टरला खडे बोल सुनावले होते.
ज्येष्ठ नेत्यांचे शब्द बिघडले तेव्हा
निषेधाच्या वेळी केवळ मध्य प्रदेश भाजपचे नेतेच नव्हे, तर पक्षाचे राष्ट्रीय नेतेही त्यांच्या जीभेवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी व्यासपीठावरून महिला अधिकाऱ्यावर कडक शब्दांत निषेध केला आणि जेएनयू शिक्षित असल्याचे सांगितले आणि ते म्हणाले की, तिथून व्हायरस आला आहे आणि हा विषाणू लोकशाही पद्धतीने निर्मूलन करायला हवा. ‘कमलनाथ जी, मी चेतावणी देतो की तुम्ही जर या अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही तर भाजप कार्यकर्ता तुमच्या कलेक्टरवर थेट कारवाई करेल.’ अशी टीका कैलास विजयवर्गीय यांनी केली होती.
Visit : bahujannama.com