नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हनी ट्रॅप गॅंगला तब्बल 1 कोटी रुपये देणाऱ्या ‘त्या’ आयएएस अधिकाऱ्याचे नाव न घेतल्याने मध्य प्रदेश पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला (CID) टीकेला सामोरे जावे लागत आहे. यासाठी सीआयडीने स्थानिक वृत्तपत्र मालक आणि वृत्तवाहिन्यांच्या दोन पत्रकारांचा डील केल्याप्रकरणी तक्रारीत उल्लेख केला आहे. शनिवारी सीआयडीने मानवी तस्करी प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी मोनिका यादवला माफीचा साक्षीदार बनणार आहे.
साक्ष आणि ऑडिओ-व्हिडिओ पुराव्यावर आधारित आरोपपत्र :
हनी ट्रॅप प्रकरणात गोळा केलेल्या ऑडिओ व व्हिडीओ पुरावे, तसेच मोनिका यादव यांची साक्ष या सर्वांच्या आधारे सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यात सांगितले कि, गॅंगमधील दोन सदस्य आणि पत्रकार गौरव शर्माने आयएएस अधिकाऱ्याकडून 1 कोटी रुपये घेऊन ती रक्कम आपापसात वाटून घेतली. दरम्यान, गौरव शर्मा भोपाळमधील एका राष्ट्रीय टीव्ही वृत्तवाहिनीचा बातमीदार आहे. गौरव सोबतच दुसरे पत्रकार वीरेंद्र शर्मा यांच्याही विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. जे एका दूरचित्रवाणी नेटवर्कच्या प्रादेशिक वाहिनीसाठी काम करत आहेत. यामध्ये एक राष्ट्रीय हिंदी वृत्तवाहिनी देखील आहे.
वीरेंद्र शर्मा यांनी अतिरिक्त मुख्य सचिव पीसी मीना यांच्याशी डील केली होती. मीनाचा हनी ट्रॅपसाठी लपून व्हिडिओ काढण्यात आला होता. वीरेंद्र यांनी त्यांच्या फ्लॅटवर 20 लाख रुपयातील आपला हिस्सा वजा करत उर्वरित रक्कम महिलांमध्ये वाटून दिली.
राज एक्स्प्रेसचे मालक अरुण सहलोत याच्याही नावाचा समावेश :
साक्षीदार मोनिका यादव यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक वृत्तपत्र राज एक्स्प्रेसचे मालक अरुण सहलोत यांचाही या आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला. सहलोत यांनीच मीनाचा व्हिडिओ व्हायरल केला असल्याचे समजते.
सीआयडीने आपल्या चार्जशीटमध्ये म्हटले की, आरोपी महिलांकडील ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा निकाल 8 ते 10 महिन्यांत उपलब्ध होईल. मिळालेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक रिपोर्टच्या अहवालाची वाट पाहत असल्या कारणाने आयएएस अधिकाऱ्यांचे नाव घेण्यात आलेले नाही. सीआयडी आता दोन पत्रकार आणि वृत्तपत्र मालकाची चौकशी करू शकते, ज्यांचे नाव दोषारोपपत्रात आले आहे.