इंदौर : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी एका महिलेने एका व्यक्तीचे प्रोफाईल पाहिले. त्याला पाहून तिला आपल्यावर १७ वर्षापूर्वी ज्याने बलात्कार केला होता, तो हाच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने तक्रार करण्याचा निर्णय घेतला. इंदूरमधील महिला पोलीस ठाण्यात १७ वर्षापूर्वी झालेल्या बलात्काराच्या आरोपावरुन एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Madhya Pradesh: A woman lodged FIR in Indore against a man for allegedly raping her 17 years ago. "She said she couldn't lodge FIR earlier as she didn't know his name. In 2020, she came across his profile on Facebook&decided to file it," said Jyoti Sharma,SHO,Women Police Station pic.twitter.com/s7LHNP6vjp
— ANI (@ANI) March 20, 2021
याबाबत या महिलेने सांगितले की तिच्यावर १७ वर्षांपूर्वी एकाने बलात्कार केला होता. मात्र, त्यावेळी त्याची काहीही माहिती नव्हती. तिला आधी त्याचे नाव माहिती नसल्यामुळे एफआयआर नोंदविता आली नाही. २०२० मध्ये तिने फेसबुकवर त्याचे प्रोफाइल पाहिले. त्यानंतर या महिलेने तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती महिला पोलीस ठाण्याच्या एसएचओ ज्योती शर्मा यांनी सांगितले.