रतलाम : वृत्त संस्था – गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने अनेकांनी ऑनलाईन शुभमंगल उरकले़ तर काहींनी लग्न पुढे ढकलली. मात्र, रतलाममधील एका लग्नाने तेथील तहसीलदार अडचणीत आले असून त्यांच्यावर चारी बाजूने टिका होत आहे. कारण नवरदेव पॉझिटिव्ह असतानाही पीपीई किट घालून हा लग्न सोहळा मुहूर्तावर उरकण्यात आला होता. या लग्नाचा व्हिडिओ समोर असल्यानंतर त्यावर टिका होऊ लागली आहे.
#WATCH | Madhya Pradesh: A couple in Ratlam tied the knot wearing PPE kits as the groom is #COVID19 positive, yesterday. pic.twitter.com/mXlUK2baUh
— ANI (@ANI) April 26, 2021
या लग्नात नववधु व नवरदेव दोघांनीही लग्नाच्या पोषाखावर पीपीई किट घातला होता. हे लग्न लावणारे ब्राम्हणही पीपीई किट घालून दोघांचे लग्न लावून देत होते. त्याचवेळी उपस्थित असणार्या लोकांनीही पीपीई किट परिधान केलेला दिसत होता.
हा सर्व प्रकार १९ एप्रिल रोजी घडला होता. नवरदेवाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अहवाल आला त्याच दिवशी नवरदेवाचा विवाह होणार होता. हे लग्न थांबविण्यासाठी महसुल कर्मचारी लग्न पोहचले़ मात्र, त्यांनी मुहूर्तावरच लग्न करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांच्या परवानगीनंतर पीपीई किट घालून लग्न उरकण्यात आले. हा व्हिडिओ समोर आल्यावर तहसीलदाराच्या अशा निर्णयावर टिका होऊ लागली आहे.