भोपाळ : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे धक्कादायक घटना घडली आहे. पंचायत इमारतीच्या समोर शौच केली म्हणून दोन दलित चिमुरड्याचा बेदम मारहाण करण्यात अली. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने केलेल्या या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे
रोशनी (वय १२) आणि अविनाश (वय १०) अशी या दोन्ही चिमुरड्यांची नावे आहेत. या दोन्ही चिमुरड्या मुलांनी पंचायत इमारतीसमोर शौच केल्याचा आरोप करत या ठिकाणी काही पाच-सहा जणांचे टोळक्यांनी या दोन्ही मुलांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या या मुलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, सिरसोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. एस. धाकड यांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांचा तपास सुरु आहे.
Visit : bahujannama.com