नांदेड :-(प्रतिनिधी) – पद्मशाली समाजाच्या सामाजिक जागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून सामाजिक जागृती करणारे सामाजिक कार्यकर्ते माधव मेकेवाड(मु.पो.भोकर ता. भोकर जिल्हा नांदेड) यांची बहुजन रयत पार्टीच्या महाराष्ट्रराज्य महासचिवपदी निवड बहुजन रयत पार्टीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आली..
आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये ते नांदेड जिल्हा संघटक व नांदेड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख म्हणून कार्य करीत होते.त्याच बरोबर नसोसवायएफ संघटना (मार्गदर्शक उदित राज व हर्षवर्धनजी दवणे) यांच्या नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टुडंट फ्रंट च्या विद्यार्थी नेतृत्वात देखील फार मोठं कार्य त्यांच्या कडून झाले आहे.अनेक विद्यार्थाना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे.
मेकेवाड यांच्या निवडीने बहुजन रयत पार्टीचे संघटन मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मुंबई प्रदेश मध्ये मोठया प्रमाणात वाढणार आहे असे या वेळी दिलीप मोहिते यांच्या कडून सांगण्यात आले आहे. माधव मेकेवाड यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, सर्वात मोठी जबाबदारी आज रोजी दिलीप मोहिते साहेबांनी जी माझ्यावर टाकली ती मी चांगली पार पाडेल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बहुजन रयत पार्टीचे बीज रोवनार असल्याचे या वेळी बोलले आहे.