नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हल्ली चेन स्नॅचिंगच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. अशा घटना शहरातच नाही तर ग्रामीणभागात देखील समोर येत आहेत. सीतापूर मधील तंबौर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मंगळसूत्र हिसकावायला आलेल्या चोरट्याचा आंगठा एका महिलेने चक्कं दाताने तोडल्याची घटना घडली आहे. ही महिला बुधवारी गावाबाहेर प्रथ:विधी साठी गेली होती तेव्हा परत गावाकडे येत असताना एका चोरट्याने तिचे मंगळसूत्र आणि कानातले दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिलेने न घाबरता या चोरट्याचा सामना केला. तिने आपल्या तोंडाने त्याचा अंगठाच तोडाला.
जखमी चोरटा आपला जीव वाचवून पळून गेला. मात्र, मंगळसूत्र घेऊन गेला. त्याचा तुटलेला अंगठा जागेवरच पडला. रक्ताच्या ठशांवरून पोलिसांनी बरच वेळ त्याचा शोध घेतला. पोलिसांनी लवकरच घटनेचा खुलासा करू असा दावा केला आहे. बसंतपूर गावात राहणाऱ्या विक्रम यादव यांची पत्नी रामादेवी बुधवारी सकाळी प्रथ:विधीसाठी गेली होती तेथून ती गावी परतत होती की, इतक्यात सायकलवर आलेल्या एका चोरट्याने तिच्यावर जोरदार हल्ला केला. त्या महिलेने निर्भयपणे त्याचा सामना केला.
चोरटा महिलेचे मंगळसूत्र व कर्णफुले घेऊन गेला. दरम्यान, महिलेने केवळ त्याच्यावर हातातील तांब्याने हल्ला केला नाही तर त्याचा अंगठा तोंडाने तोडून तो वेगळा केला. या महिलेचे धाडस पाहून चोरटा पळून गेला. मात्र त्याचा मफलर आणि तुटलेला आंगठा त्या जागेवरच पडला होता. या घटनेची माहिती मिळताच एसओ अमित भदौरिया घटनास्थळी पोहचले.
पोलिसांनी सांगितले की,आराेपीच्या रक्ताच्या ठशांवरून आम्ही त्याचा खूप पाठलाग केला पण अजून त्याचा पत्ता लागला नाही. या घटनेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला लवकरच पकडण्यात येईल असे आश्वसन पोलिसांनी दिले आहे.