नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान, मेच्या पहिल्या दिवशी, सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 162.5 रूपये स्वस्त झाले आहे. आता नवीन किंमती 581.50 रुपयांवर आल्या आहेत. त्याचवेळी 19 किलो सिलिंडरची किंमत 256 रुपयांनी घसरून 1029.50 रुपये झाली आहे.
एलपीजी सिलेंडरच्या नवीन किमती –
– आयओसी वेबसाइटवर दिलेल्या किंमतीनुसार आता दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 744 रुपयांवरून 581 रुपयांवर आली आहे.
– त्याच वेळी ते कोलकातामध्ये 774.50 रुपयांवरून 584.50 रुपये, मुंबईत 714.50 रुपयांवरून 579.00 रुपये आणि चेन्नईत 761.50 रुपयांवरून 569.50 रुपये झाले आहेत.
19 किलो एलपीजी सिलिंडर
– 19 किलो एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीतही किमतीतही कपात करण्यात आली आहे. ज्या एक मेपासून अस्तित्वात येणार आहेत. दिल्लीतील 19 किलो एलपीजी सिलिंडर 256 रुपयांनी स्वस्त झाले आहे. यापूर्वी गॅस सिलिंडरची किंमत 1285.50 रुपये होती, जी 1 मेपासून 1029.50 रुपयांवर आली आहे.
– त्याचप्रमाणे त्याचे दर कोलकातामध्ये 1086.00 रुपये, मुंबईत 978.00 रुपये आणि चेन्नईत 1144.50 रुपयांवर आले आहेत.
सलग 38 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर बदलले नाहीत
लॉकडाऊनच्या आज 38 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. लॉकडाऊनमुळे देशात सर्वकाही बंद असल्याने पेट्रोल आणि डिझेलची मागणी कमी झाली आहे. आयओसीएलच्या वेबसाइटनुसार दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 69.59 रुपये तर डिझेलची किंमत 62.29 रुपये प्रति लिटर आहे.
एनपीन्यूज24 नेटवर्क