नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता तुम्ही घरबसल्या केवळ व्हॉट्सअपवर मॅसेज करून गॅस सिलेंडरची बुकिंग करू शकता. भारताची सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी जसे की, भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅससुद्धा ग्राहकांसाठी व्हॉट्सअपवरून सिलेंडर बुक करण्याची सर्व्हिस देत आहेत. कशाप्रकारे तुम्ही काही सेकंदात व्हॉट्सअपद्वारे गॅस बुकिंग करू शकता, ते जाणून घेवूयात…
Bharat Gas च्या ग्राहकांनी असा बुक कराव सिलेंडर
भारत गॅसच्या बुंकिंगसाठी तुम्हाला मोबाईलमध्ये 1800224344 नंबर सेव्ह करावा लागेल. नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला कंपनीकडे तुमच्या रजिस्टर नंबरच्या व्हॉट्सअपवर जावे लागेल. यानंतर सेवेसाठी भारत गॅस म्हणजे भारत पेट्रोलियम स्मार्ट लाइन नंबर उघडा. यानंतर व्हॉट्सअपवर इंग्रजीत हाय किंवा हॅलो लिहून पाठवा. ताबडतोब उत्तर येईल. ज्यामध्ये व्हॉटसवर एजन्सीद्वारे स्वागत केले जाईल. सिलेंडर जेव्हा बुक करायचा असेल, तेव्हा केवळ व्हॉट्सअपवर Book लिहून पाठवा. यानंतर लगेचच ऑर्डर डिटेल मिळेल आणि कोणत्या दिवशी सिलेंउर डिलिव्हर होईल, हे सुद्धा व्हॉट्सअपवर लिहून येईल.
इंडेन गॅस ग्राहकांनी अशा प्रकारे बुक करावा सिलेंडर
इंडेन गॅसच्या ग्राहक 7588888824 नंबरवर बुकिंग करू शकतात. ग्राहकांनी हा नंबर आपल्या मोबाईमध्ये सेव्ह करावा. यानंतर कंपनीकडे रजिस्टर असलेल्या नंबरचे व्हॉट्सअप ओपन करावे. सेव्ह केलेला नंबर ओपन करून आपल्या त्या रजिस्टर्ड नंबरवरून Book किंवा REFILL# लिहून पाठवा. यानंतर ऑर्डर पूर्ण झाल्याचे उत्तर येईल. रिप्लायमध्ये सिलेंडर बुकिंगची डिलिव्हरी केव्हा होईल, याची तारीख सुद्धा लिहिलेली असेल.
एचीपीचे ग्राहक अशाप्रकारे करू शकतात सिलेंडर बुकिंग
एचपीच्या ग्राहकांनी 9222201122 हा नंबर आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करावा. या नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअप ओपन करून सेव्ह केलेला नंबर ओपन करावा. या नंबरवर Book लिहून पाठवा. यानंतर व्हॉटसअपवर ऑर्डर डिटेल येईल. यानंतर सिलेंडरची डिलिव्हरी डेटसह सर्व डिटेल येईल. यासाठी तुमचा मोबाईल नंबर कंपनीकडे रजिस्टर असणे आवश्यक आहे.