नवी दिल्ली : वृत्त संस्था – LPG Cylinder Rate | देशांतर्गत गॅस कंपन्याही काळानुसार बदलू लागल्या आहेत. कंपन्यांनी आता घरगुती गॅस सिलिंडरमध्येही बदल केला आहे. सामान्य गॅस सिलिंडर व्यतिरिक्त त्यांनी आता कंपोझिट गॅस सिलिंडर (Composite Gas Cylinder) देखील देऊ केले आहेत. वजनाने कमी असलेला हा सिलिंडर दिल्लीत 634 रुपयांना विकत घेता येईल. जयपूरच्या ग्राहकांना यासाठी 637 रुपये मोजावे लागणार आहेत. (LPG Cylinder Rate)
कंपोझिट गॅस सिलिंडरमध्ये 10 किलो गॅस असतो. कम्पोझिट गॅस सिलेंडर पारदर्शक आहे. त्याचे वजन कमी असल्याने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेणे सोपे आहे. ज्या घरामध्ये गॅसचा वापर कमी आहे त्यांच्यासाठी हा सिलेंडर खूप उपयुक्त आहे.
कंपोझिट सिलेंडर लोखंडी सिलिंडरपेक्षा 7 किलोने हलका आहे. सध्या वापरल्या जाणार्या घरगुती सिलिंडरचे वजन 17 किलो आहे. कंपोझिट सिलिंडर नक्कीच हलका आहे पण तो मजबूत आहे. त्याला तीन थर आहेत. (LPG Cylinder Rate)
10 किलोच्या कंपोझिट सिलेंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस असेल. अशा प्रकारे त्याचे एकूण वजन 20 किलो होईल. दुसरीकडे, सामान्य लोखंडी सिलिंडरचे वजन 30 किलोपेक्षा जास्त होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरे आणि कम्पोझिट गॅसची किंमत
- मुंबईत 10 किलो गॅससह कम्पोझिट गॅस सिलिंडर 634 मध्ये विकत घेता येईल.
- कोलकात्यात त्याचा दर 652 तर चेन्नईत 645 रुपये आहे.
- लखनऊमध्ये यासाठी ग्राहकाला 660 रुपये मोजावे लागणार आहेत.
- पाटण्यात त्याची किंमत जवळपास 697 रुपये आहे.
- इंदूरमध्ये 653 रुपयांना खरेदी करता येईल.
- कंपोझिट गॅस सिलिंडर भोपाळमध्ये 638 रुपयांना मिळेल.
- गोरखपूरमध्ये त्याची किंमत 677 रुपये ठेवण्यात आली आहे.
Web Title : LPG Cylinder Rate | lpg cylinder rate in new year 2022 composite gas cylinder.