नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल-डिझेलच्या दराने देशातील नागरिकांचे जगणे अवघड केले आहे, आता घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरचे (LPG Gas Cylinder) दर सुद्धा वाढले आहेत. आज म्हणजे 1 जुलैपासून इण्डेनच्या सिलेंडर (LPG Gas Cylinder) साठी तुम्हाला 25 रुपये जास्त द्यावे लागतील. lpg cylinder becomes expensive from today know the new rates released on july 1
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
आज दिल्लीत LPG सिलेंडरचा दर 834 रुपये आहे. दिल्लीत यावर्षी जानेवारीत LPG सिलेंडरचा दर 694 रुपये होता, तर फेब्रुवारीमध्ये वाढून 719 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आला. 15 फेब्रुवारीला दर वाढवून 769 रुपये करण्यात आला. यानंतर 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरचा दर 794 रुपये करण्यात आला. मार्चमध्ये LPG सिलेंडरचा दर 819 रुपये करण्यात आला.
घरगुती एलपीजी सिलेंडर 1 जुलै 2021 पासून प्रभावी दर
दिल्ली – 834
कोलकाता – 861
मुंबई – 834.5
चेन्नई – 850
स्रोत : IOC
19 किलोच्या सिलेंडरचे दर सुद्धा वाढले
आज 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार दिल्लीत आता याचा दर 1473.5 रुपयांवरून वाढून 1550 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे.
एलपीजी 19 kg गॅस सिलेंडर 1 जुलैपासून प्रभावी दर
दिल्ली – 1550
कोलकाता – 1651.5
मुंबई – 1507
चेन्नई – 1687.5
Web Titel : lpg cylinder becomes expensive from today know the new rates released on july 1
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update