बहुजननामा ऑनलाइन टीम – औरंगाबाद सत्र न्यायालयाने एका रोड रोमिओला ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावताना न्यालयाने असे स्पष्ट केले आहे की, स्त्रियांकडे एकटक बघणे हा विनयभंगच आहे. तसेच मुलींना अशा रस्त्यात असणाऱ्या टवाळखोर गुंडापासून बचावासाठी तर आशा निकालामुळे पीडित मुलींना बळ मिळणार आहे. पुढे येऊन तक्रार केली तर अशा सडकछाप रोड रोमिओंना कायदेशीररित्या धडा शिकवता येतो, असे औरंगाबाद सत्र न्यायालयाच्या या निकालाने स्पष्ट केलं आहे.
भारतीय दंड विधान (IPS) आणि ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत औरंगाबाद पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या केसमध्ये एकूण ६ साक्षीदारांनी न्यायालयात दिलेली साक्ष महत्वाचं ठरली आहे. त्यानुसार या अल्पवयीन मुलीला एकटक पाहिल्याबद्दल औरंगाबादचे विशेष कोर्टाचे न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दामोदर राबडा या रोड रोमिओला ६ महिने सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड ठोठावला आहे.
दरम्यान, एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला छळत असलेल्याचा आरोप ठेवत २०१७ वर्षी या आरोपीला अटक करण्यात आली होती. ही मुलगी शाळेत जात असताना हा आरोपी सतत तिचा पाठलाग करायचा. तसेच तिच्या नजरेत येण्यासाठी सतत तिच्या घरासमोरील बगीच्यात बसून ती सायकल चालवत असताना तिला एकटक पाहत असायचा. एक वेळ ती मुलगी तिच्या मामाच्या घरी गेली होती. तेव्हा त्या ठिकाणीही या रोड रोमिओनं तिचा पाठलाग केला. तेव्हा मामानं आपल्या मित्राच्या मदतीने या रोड रोमिओला धरून पोलिसांच्या ताब्यात दिल आहे.