Lok Sabha Election 2024 | राष्ट्रवादीचं मिशन लोकसभा, विभागवार नेत्यांना दिली जबाबदारी; पुणे विभागाची जबाबदारी ‘या’ तरुण नेत्यावर
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Lok Sabha Election 2024 | लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची महत्त्वाची बैठक आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर (Lok Sabha Election 2024) चर्चा झाली. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) कोणत्या जागेवर लढायचे आणि कोणत्या जागेवर पाठिंबा द्यायचा यासंदर्भात रणनिती ठरवण्यात आली. तसेच तालुका आणि जिल्हा अध्यक्ष देखील बदलण्यात येणार असून जे सलग तीन टर्म अध्यक्ष राहिले आहेत, त्यांना बढती देण्याचा मोठा निर्णय झाल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. राज्यातील व देशातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदरणीय पवार साहेबांनी पक्षाच्या… pic.twitter.com/mx1PNrWQpR
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 17, 2023
आज झालेल्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) या महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपसमोर (BJP) एक मजबूत पर्याय यामुळे तयार होणार आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी क्रमांक दोनचा पक्ष आहे, अशा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाच्या वतीने प्रमुख नेत्यांवर विभागवार सोपवण्यात आली आहे.
विभागवार नेत्यांवर जबाबदारी
नागपूर विभाग (Nagpur Division) – अनिल देशमुख (Anil Deshmukh)
अमरावती विभाग (Amravati Division) – जितेंद्र शिंगणे (Jitendra Shingane)
नाशिक (Nashik) अहमदनगर (Ahmednagar) मराठवाडा विभाग (Marathwada Division) – धनंजय मुंडे (Dhananjay Munde) कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), सांगली (Sangli) – शशिकांत शिंदे (Shashikant Shinde)
पुणे विभाग (Pune Division) – सुनील शेळके (Sunil Shelke)
कोल्हापूर (Kolhapur) – अशोक पवार (Ashok Pawar)
खानदेश (Khandesh) – एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि अनिल पाटील (Anil Patil)
कोकण विभाग (Konkan Division) – अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) आणि शेखर निकम (Shekhar Nikam)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Lok Sabha Election 2024 | ncp meeting in the background of lok sabha and vidhan sabha elections
हे देखील वाचा
Pune BJP News | पुणे भाजपमध्ये खांदेपालट होणार, नवीन शहराध्यक्ष, 2 जिल्हाध्यक्ष शनिवारपर्यंत निश्चित
ACB Trap News | बिल्डरकडून 2 लाखाची लाच घेणारा वरिष्ठ अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळयात
Comments are closed.