सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – सोलापूर मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून स्वतः प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस चे उमेदवार सुशील कुमार शिंदें व भाजपकडून डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामींना उमेदवारी दिली आहे. इतके दिवस सोलापूरमधील दलित समाजासाठी शिंदेनी काय केले.असा सवाल करीत शिंदेंवर चौफेर सडकून टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टानं राज्यघटना तयार केली. त्यांचेच नातू जातीयवादी पक्षाशी युती करून त्या राज्यघटनेचा खून करण्यास निघाले आहेत. अशी टीका सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात बोलताना केली होती. शिंदेवर जोरदार प्रतिहल्ला करत प्रकास आंबेडकरांनी त्यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले.काँग्रेसने घटना बदलण्याचा प्रयत्न केला होता.तुम्ही विसरलात का ? तुमच्याच दिवंगत नेत्यांनी लोकशाहीऐवजी अध्यक्षीय निवडणुकीचा पुरस्कार केला होता. हे कसे विसरून चालणार ? वयानुसार तुमची स्मरणशक्ती फार कमी झाली असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला.
शिंदे बोलताना म्हणाले कि ढसाळे, ढाले, आणि ओवैसींची भाषा एकच आहे.यांच्या भाषांमुळे समाजात तेढ निर्माण होतो. शिंदेनी आंबेडकरांवर जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एमआयएमशी मैत्री करून राज्यघटनेला गाडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी टीका शिंदेंनी केली होती.