नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांना भाजपकडून राज्यसभेत पाठवलं जाणार असल्याचा सांगितले जात होते ,मात्र भाजपच्या दुसऱ्या यादीत एकनाथ खडसे यांचं नाव नाही. तर डॉ. भागवत कराड यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर अमरीश पटेल यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या अगोदरची भाजपने जाहीर केलेल्या यादी मध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी देण्यात आली. मावळचे खासदार संजय काकडे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. 26 मार्च रोजी राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
राज्यात एकूण सात जागांसाठी निवडणूक होत असून विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या चार आणि भाजपच्या तीन जागा निवडून येऊ शकतात. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी 5 जागांवर निवडणूक होत आहे आणि ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे तर आसाम आणि राजस्थानमधून 3 जागा रिक्त होत आहेत. तामिळनाडूत 6 जागा रिक्त होत आहेत.