नवी दिल्ली : वृत्त संस्था – Liquor sales | कोरोना(corona) संकटामुळे देशात वर्क फ्रॉम होम(work from home)चे कल्चर विकसित झाले आहे. हे कल्चर केवळ कामापर्यंत मर्यादित नाही तर हे दारूपर्यंत पोहचले आहे. लोक आता घरात जास्त दारू (alcohol at home) पित आहेत. इंटरनॅशनल वाईन अँड स्पिरिट्स रिसर्च (IWSR) च्या आकड्यांनुसार देशात मागील वर्षी ऑन ट्रेड चॅनलच्या मदतीने 11 टक्के जास्त दारू विकली गेली. हे तोपर्यंत जेव्हा, देशात बार आणि रेस्टॉरंट (bars and restaurants) मध्ये 2020 मध्ये दारूचा खप केवळ 10 टक्के झाला होता.
इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तात युनायटेड स्पिरिट्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आनंद कृपाळू यांनी म्हटले कोरोना संकट काळात (Covid-19 pandemic) लोकांना असे वाटले की, घरात दारू पिणे स्वस्त ठरू शकते. यासोबतच कॅज्युअल गेट टु गेदर(casual get together)ची संख्या कमी झाल्याने घरात लोकांनी दारू प्यायल्याने खर्चावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले.
हे आहे कारण
देशात दारूच्या एकुण खपात बार आणि रेस्टॉरंटची (bar and restaurant)भागीदारी सुमारे एक तृतीयांश आहे. कोरोना संकटामुळे देशात बार आणि रेस्टॉरंट मागील वर्षापासून बंद करावे लागले होते. नंतर जेव्हा त्यांना कामाची परवानगी मिळाली ती सुद्धा खुप कमी क्षमतेसह मिळाली. यानंतर दारू पसंत करणार्या लोकांनी घरातच दारू पिणे सुरू केले.
–
वाढली दारूची विक्री
इंटरनॅशनल वाईन अँड स्पिरिट्स रिसर्चच्या आकड्यांनुसार 2019 मध्ये या बार आणि रेस्टॉरंट चॅनलद्वारे देशाचा एकुण दारूचा खप 27 टक्के झाला होता. तर 2020 मध्ये ही विक्री 10 टक्केवर आली.
कारण लोकांनी घरात दारू पिणे सुरू केले.
यामुळे ऑफ प्रिमाईस किंवा रिटेल स्टोअरची विक्री 88 टक्केवर पोहचली. तर 2019 मध्ये ती 73 टक्के होती.
ऑनलाइन सेलमध्ये डिलिव्हरी चार्जची बाधा
देशाच्या अनेक राज्यात अल्कोहोलच्या होम डिलिव्हरी(alcohol home delivery)ची परवानगी दिली गेली आहे.
यातून दारूचा ऑनलाइन सेल(liquor online sale)वाढण्याची अपेक्षा होती.
परंतु डिलिव्हरी चार्ज(delivery charge) आणि त्याचे कमजोर फ्रेमवर्क, नियामकाची अनिश्चित पावले आणि गुंतवणुक(investment) करण्यात संकोच इत्यादी अडचणी आहेत.
मागच्या वर्षी ऑनलाइन चॅनलच्या मदतीने 53.5 कोटी रुपयांच्या दारूची विक्री करण्यात आली.
ही ओव्हरऑल स्पिरिट मार्केटच्या 0.1 टक्के आहे.
चष्म्यामुळं चेहर्यावर पडलेले डाग ‘या’ 5 मार्गाने करा दूर, जाणून घ्या
‘स्मोकिंग’च्या सवयीने त्रस्त आहात का ? योगा करा आणि सोडवा व्यसन
फक्त १० मिनीटात असे वाढवा ‘ब्लड सर्कुलेशन’, ‘ही’ आहे सोपी पद्धत
या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
web title: Liquor sales increased despite the closure of bars-restaurants and parties, find out because