मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Liquor Home Delivery Stopped In Maharashtra | राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) दारूच्या होम डिलिव्हरी म्हणजे दारूच्या घरपोच सेवाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात दारूची होम डिलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती निवळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. याबाबत माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.
“कोविडचे प्रमाण कमी असल्याने आम्ही दारूची होम डिलिव्हरी बंद करत आहोत. लॉकडाऊनच्या काळात ही व्यवस्था होती.” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर दारूची होम डिलिव्हरी सुरू करण्यात आली होती. मात्र, ही डिलिव्हरी परवानाधारक दुकानांसाठी होती. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता केसेस कमी झाल्यामुळे सरकारने होम डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे. तसेच, राज्याच्या गृह विभागाने (Maharashtra Home Department) महाराष्ट्र उत्पादन शुल्क आयुक्तांना (Commissioner of Excise, Maharashtra) पत्र लिहून दारूची होम डिलिव्हरी बंद करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. (Liquor Home Delivery Stopped In Maharashtra)
राज्यातील कोरोनास्थितीबाबत अजित पवार म्हणाले…
“सध्या कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून ही काळजीची बाब आहे. मास्क वापरणे गरजेचे असून राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे,” अजित पवारांनी सांगितले. ‘मागील अनुभव लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही,’ पवार यांनी सांगितले आहे.
Web Title :- Liquor Home Delivery Stopped In Maharashtra | home delivery of liquor stopped in the state ajit pawar s announcement
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Symptoms Of Cervical | तुम्हाला सर्वाइकल झाला आहे का?; जाणून घ्या काय आहेत लक्षणे
Pune Crime | घरात गांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक
Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर ! CBI ने दाखल केले आरोपपत्र
Pune Crime | पुण्यात जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा, 12 जणांना अटक