लातूर : बहुजननामा ऑनलाइन – लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्या वतीने लिंगायत महासंघाचे प्रातांध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष बाबूराव माशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील रघकूल मंगल कार्यालयात झालेल्या लिंगायत समाज वधू-वर परिचय मेळाव्यास ४०० वधु-वर व एक हजार पालकांनी उत्स्फूर्त हजेरी लावल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत काला यांनी दिली.
या वधु-वर मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी शिवप्रसाद महाराज हिरेमठ संस्थान भालकी व शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजय बनसोडे, रमेश अंबरखाने, नागनाथ निडवदे, नरेश सोनवणे, चंद्रकांत वैजापुरे, सुनील कांबळे, नगनाथ गायकवाड, सत्यशीलाताई बिरादार, जि. प. सदस्य विजयाताई बिरादार, डी. वाय. एस. पी. भीमाशंकर हिरेमुखे, पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे, उत्तराताई कलबुर्गे, सरोज वारकरे, बाबूराव माशाळकर, जिल्हाध्यक्ष दीपक शिवपुजे, उपाध्यक्ष नागनाथप्पा भुरके, सुभाषप्पा मुक्ता, काशिनाथ मोरखंडे, शिवाजी भातमोडे, सिद्रामप्पा पोपडे, माणिकअप्पा मरळे, शंकर पाटील चिगळीकर, गुरुनाथ काडवदे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार हे होते. यावेळी अनेक वक्त्यांची भाषणे झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष बाबूराव माशाळकर, उपाध्यक्ष सुभाष बिरादार, बसवराज विश्वनाथे, सरचिटणीस प्रभुराज कप्पीकेरे, संयोजन समितीचे महादेव हरकरे, प्रभुराज कप्पीकेरे, तालुकाध्यक्ष अमरनाथ मुळे, कोषाध्यक्ष शांतवीर मुळे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत काला, कल्लप्पा काला, शिवहार निंगदाळे, राहुल तोंडारे, बसवराज बिरादार, बाबूराव शेटकार, सहसचिव शिवकुमार उप्परबावडे, श्रीमती लक्ष्मीबाई पांढरे, हणमंतराव औरादे, प्रा. डॉ. राजेश्वर पाटील, प्रा. सोमेश्वर रोडगे, प्रा. माणिकराव बिरादार, कवी शिवाजी स्वामी, धनराज बिरादार, प्रा. मनोहर भालके, प्रा. डॉ. वैजनाथ हुडगे, कांताबाई बुळ्ळा, गुंडप्पा बागबंदे, गजानन दापकेकर, प्रा. शिवकुमार उस्तुर्गे, सतीश पाटील हैबतपूरकर, प्रा. आडेप्पा अंजुरे, श्रीमती सीमा पाटील, प्रा. डॉ. अश्विन हावा, प्रताप रोडगे, प्रा. सुनील वीरकपाळे, शिवराज रंडाळे, अरविंद धानुरे, शिवराज तोंडारे, हणमंतराव बुळळा, पंचय्या स्वामी, प्रा. कासनाळे, सुशील जीवने, मल्लिकार्जुन बेलुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रदीप बेद्रे यांनी आपले मंगल कार्यालय वधु-वर मेळाव्यासाठी उपलब्ध करुन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश मळगे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सुभाष बिरादार व प्रा. डॉ. अश्विन हावा यांनी मानले.