नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील नामांकित उद्योगपती रतन टाटा यांना टेकॉन मुंबई २०२० लाईफ टाईम अचिव्हमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून कॉर्पोरेट क्षेत्रातील त्यांच्या मोलाची ओळख असलेल्या इन्फ्राचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी टाटा यांना हा पुरस्कार दिला. दरम्यान नारायण मूर्ती यांनी पुरस्कार दिल्यांनतर रतन टाटा यांच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतला. मुंबईतील टायकॉन अवॉर्ड फेस्टिवलमध्ये रतन टाटा यांनी स्टार्टअप गुंतवणूकदारांना चेतावणी देत जे गुंतवणूकदार पैसे बुडवून गायब होतात त्यांना दुसरी किंवा तिसरी संधी मिळणार नाही, असे सांगितले.
तसेच जुन्या काळातील व्यवसाय हळूहळू कमकुवत होतील. त्यासाठी नवीन युगातील नाविन्यपूर्ण कंपन्यांचे तरुण संस्थापक भारतीय व्यवसायाचे भावी नेते असतील, असेही ते म्हणाले. ईकॉमर्स कंपनी स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक करणारे टाटा यांनी व्यवसायात नैतिकता राखली पाहिजे. रात्रभर चमकण्याचा मार्ग टाळला पाहिजे, असे म्हणाले. तसेच स्टार्टअपसाठी मार्गदर्शन, सल्ला,नेटवर्किंग आणि मान्यता आवश्यक असून पैसे बुडल्यानंतर गायब झालेल्या गुंतवणूकदारांना दुसरी किंवा तिसरी संधी मिळणार नसल्याचेही ते म्हणाले. पुढे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती हे बोलत होते.
ते म्हणाले की पेन्शन फंड आणि बँकांमधील भारतीय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करावी. केवळ निवडक गुंतवणूकदारांच्या आधारावर स्टार्टअपसाठी एक सकारात्मक वातावरण तयार केले जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी आणखी निधी उभा करायचा असेल तर पेन्शन फंड आणि बँकांना गुंतवणुकीसाठी पुढे यावे लागेल. नारायण मूर्ती यांनी पायाला स्पर्श केल्यावर ट्विटरवर अनेक लोकं त्याचे कौतुक करत आहेत. एका युजरने हा एका अतिशय सुंदर देखावा आहे. व्यवसाय आणि संस्कृतीचे उत्तम उदाहरण सादर केले आहे, असे म्हटले आहे. त्याच वेळी काही लोकांनी या क्षणाचे वर्णन या वर्षाचे सर्वात उत्कृष्ट चित्र म्हणून केले आहे.
Visit : bahujannama.com