बहुजननामा ऑनलाइन – आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस आहे. ते आज ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.
यावेळी बालताना शरद पवार म्हणाले की, ‘१२ डिसेंबर माझ्या जन्मदिवसापेक्षा माझ्या आईचा जन्म दिवस आहे ते लक्षात राहत. माझ्या आईने अनेक कष्ट केले. ती शेतात काम करायची, जे पिक येईल ते बाजारात पोहचविण्याचे काम करायची. सामाजिक कामाची तिला आवड होती. अतिशय कष्टाने तिने आम्हाला शिकवले आणि वाढविले. 1936 साली ची पहिल्यांदा निवडून आली होती. महिलांच्यावतीने महिलांसाठी काम करता येते हा आदर्श त्यांनी घालून दिला. मुलींचे शिक्षण, आत्मविश्वासाने मुलींनी पुढे आले पाहिजे हा त्यांचा आयुष्यभर आग्रह होता. अनेक गोष्टी तिच्या सांगण्यासारख्या आहेत. सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकवेळा यश मिळते. कधीकधी संकट येत असतात. या संकटाला सामोरे जाण्याची शक्ती कोणाकडून येतात याचा विचार मी करतो त्यावेळी २ जण माझ्यासमोर येतात. एक माझी आई अन् दुसरी महाराष्ट्राची जनता,’ असे त्यांनी सांगितले.
शरद पवार पुढे म्हणाले की, ‘१२ डिसेंबरला माझ्या आईचा जन्म झाला. बायकोचा जन्म १३ डिसेंबरला झाला तर अनेक मित्र आहेत ज्यांचा जन्म ११ डिसेंबरला झाला आहे. एकेकाळई या देशाची चित्रपटसृष्टी गाजविणारे दिलीप कुमार, ते माझे जवळचे मित्र आहेत. त्यांच्याही जन्म ११ डिसेंबरला झाला. त्यामुळे ११, १२, १३ गेले अनेक वर्ष आम्ही खाजगीत कोणाच्या तरी घरी एकत्र जमून एकमेकांचे अभिष्टचिंतन करत असतो.’
त्याचबरोबर सत्तेत असताना अनेक धोरणे राबविता येतात. ज्या माणसांसाठी आपण योजना आणतो. त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचतआहे की नाही याची खरे वास्तव सत्तेतून दूर गेल्यावर कळते. आपली बांधिलकी समाजाशी आहे, तरुण पिढीशी आहे. यांना जोडून घेण्यासाठी काम करा असे मार्गदर्शन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.