आता पेन्शनधारक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांचा हयातीचा दाखला सादर करू शकतात. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग यांनी या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, विविध राज्यांमध्ये सुरू असलेली कोविड-19 महामारी पाहता, आता सर्व वयोगटातील पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्याची कालमर्यादा 31.12.2021 च्या पुढे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
28 फेब्रुवारीपर्यंत हयातीचा दाखला द्या
विभागाने म्हटले आहे की आता केंद्र सरकारचे सर्व पेन्शनधारक 28/02/2022 पर्यंत हयातीचा दाखला सादर करू शकतात. या वाढीव कालावधीत, पेन्शन वितरण अधिकार्या (PDAs) द्वारे कोणत्याही व्यत्ययाशिवाय पेन्शन देणे सुरू ठेवले जाईल. मंत्रालयाने म्हटले आहे, की जीवन प्रमाणपत्रासाठी गर्दी टाळणे आणि कोविड-19 चे नियम पाळणे अपेक्षित आहे.
येथे सादर करू शकता हयातीचा दाखला
पेन्शन वितरण प्राधिकरण (PDA) जसे की बँका, पोस्ट ऑफिस आणि इतरांकडून पेन्शन प्राप्त करणारे पेन्शनधारक घरीसुद्धा जीवन प्रमाणपत्र देऊ शकतात. निवृत्तीवेतनधारक त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र PDA ला वैयक्तिकरित्या किंवा ऑनलाइन सबमिट करू शकतात.
Web Title :- Life Certificate | good news for for pensioners life certificate last date to submit extended to 28 feb 2022 check details
Pune Crime | पुण्यातील दुर्दैवी घटना ! 2 वर्षाच्या चिमुकल्याला टँकरने चिरडले