नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Saral Pension Yojana | जर तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी पेन्शन योजना घेण्याचा प्लान करत असाल तर भारतीय आयुर्विमा महामंडळ(Life Insurance Corporation of India) तुमच्यासाठी एक जबरदस्त प्लान घेऊन आले आहे. ही पॉलिसी घेताना केवळ एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहिल. या पॉलिसीचे नाव सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Yojana) आहे.
एलआयसी पेन्शन योजना एक सिंगल प्रीमियम प्लान आहे. या योजनेची सुरूवात 1 जुलैपासून झाली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…
सरल पेन्शन योजना घेण्यासाठी 2 पद्धती :
पहिली लाईफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राईस सिंगल लाइफसाठी आहे. दुसरी पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी दिली जात आहे.
सिंगल लाईफ :
पहिली लाईफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राईस सिंगल लाइफसाठी आहे.
म्हणजे ही पेन्शन योजना एकाच व्यक्तीशी संबंधीत असेल. पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळत राहील. यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जॉईंट लाईफ :
दुसरी पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी दिली जात आहे. यामध्ये पती किंवा पत्नी, जो जास्त काळ जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही जिवंत नसतील तेव्हा नॉमिनीला बेस प्राईस मिळेल.
सरल पेंशन योजनेची वैशिष्ट्ये
– विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्याची पेन्शन सुरू होईल.
– मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता.
– ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेता येऊ शकते.
– या योजनेत 12000 रुपये वर्षाचे किमान लावाले लागतील. यात कमाल मर्यादा नाही.
– तुम्ही 40 ते 80 वर्षाच्या वयात कधीही एकरक्कमी पैसे जमा करून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. ही पेन्शन आयुष्यभर मिळेल.
– शिवाय पॉलिसी सुरू झाल्याच्या 6 महिन्यानंतर कर्जाची सुद्धा सुविधा आहे.
Web Titel :- LIC Saral Pension Yojana | lic give rs 12000 per month in one time investment in this policy check all details here.
Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! नागपुरमधील मालमत्तांवर आयकर विभागाचा छापा