नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC | जर तुम्ही आयुर्विमा महामंडळाची (Life Insurance Corporation of India: LIC) पॉलिसी घेतली असेल तर त्यासोबत पर्मनंट अकाऊंट नंबर (Permanent Account Number : PAN) अपडेट करणे अनिवार्य आहे. काही कारणास्तव हे केले नसेल किंवा आठवतच नसेल की पॅन डिटेल अपडेट केल्या किंवा नाही? तर ही गोष्ट सहज केली जाऊ शकते.
हे काम ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने केले जाऊ शकते. तुम्ही एलआयसीच्या वेबसाईटच्या मदतीने, जवळचे एलआयसी ऑफिस / एलआयसी ऑफिस किंवा एजंटद्वारे हे काम करू शकता.
LIC सोबत अशाप्रकारच्या पॅन अपडेट करा :
1) एलआयसीची अधिकृत वेबसाइट https://licindia.in/ OR licindia.in/Home/Online-PAN-
2) ऑनलाइन पॅन रजिस्ट्रेशनचा ऑपशन निवडा.
3) ऑनलाइन पॅन रजिस्ट्रेशन पेजवर पुढे जा वर क्लिक करा.
4) ईमेल आयडी, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी नंबरची माहिती भरा.
5) बॉक्समध्ये कॅप्चा कोड टाका.
6) रजिस्टर्ड मोबाइल नंबरने OTP साठी रिक्वेस्ट करा.
7) ओटीपी मिळाल्यानंतर तो सबमिट करा.
8) फॉर्म जमा केल्यानंतर रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.
पॅन-एलआयसीची तपासणी अशी करा
1) http://www.licindia.in OR linkpan.licindia.in/
2) पॉलिसी नंबर, जन्मतारीख आणि पॅनची माहिती, सोबतच कॅप्चा नोंदवा.
3) नंतर सबमिट बटन दाबा.
Web Title :- LIC | how to update pan card details with lic online and offline know process.